कोकण

मराठी भाषा गौरव दिन

CD

मालगुंड येथे आज
मराठी भाषा गौरव दिन
रत्नागिरी ः कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग, मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ वा. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजित गाताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड व सदस्य मराठी भाषा समिती गजानन पाटील, आनंद शेलार, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे हे उपस्थित राहणार आहेत.

संरक्षण समितीची
आज बैठक
रत्नागिरी ः पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. २७) दुपारी १२ वा. पोलिस अधीक्षक कार्यालय येथे माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास बैठकीत आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

लघुउद्योजक पुरस्कारास
अर्ज करा ः उद्योग केंद्र
रत्नागिरी ः जिल्ह्यातील स्थायीरित्या लघुद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकांकडून उत्कृष्ट लघुद्योजकास जिल्हा पुरस्कार २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. लघु व सुक्ष्म उद्योग घटकांनी ४ मार्चपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक अ. अ. आजगेकर यांनी केले आहे. जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत लघुउद्योग घटकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व लघुउद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी पात्र लघुउद्योगांना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पुरस्कार देण्याची योजना शासनस्तरावर राबवण्यात येते. हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षात दोन पात्र उद्योग घटकांना देण्यात येतात. प्रथम पुरस्कारास १५ हजार रोख, गौरवचिन्ह व शाल श्रीफळाने सन्मानित तर द्वितीय पुरस्कारास १० हजार रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळाने सन्मानित असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पात्र उद्योजकांनी ४ मार्चपूर्वी जिल्हा उद्योगकेंद्र, रत्नागिरी (औद्योगिक विकास महामंडळ, एमआयडीसी इमारत), जे. के. फाईल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योगकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.

बेलापूर येथे आज
भव्य नगर कीर्तन
रत्नागिरी ः ‘हिंद की चादर’ गुरु श्री तेगबहादूरजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमाच्या पावननिमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्या (ता. २७) सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरू साहिबांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

गोगटे महाविद्यालयात
आज विज्ञान प्रदर्शन
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उद्या (ता. २७) ‘विज्ञानातील महिला : विकसित भारत घडवण्यात प्रेरक शक्ती’ या संकल्पनेवर आधारित ‘जीजेसी सायन्स-फेस्ट २०२६’ अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत प्रदर्शन होईल. या निमित्ताने शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व विज्ञानप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञानप्रकल्प, विभागीय प्रदर्शने, प्रयोगशाळा भेटी, विज्ञान उद्योजकांचे स्टॉल्स आणि विज्ञानानावर आधारित विविध खेळ यांचा समावेश असणार आहे. प्रत्यक्ष उद्योग, आकर्षक मॉडेल्स आणि नवकल्पनांच्या माध्यमातून विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व विज्ञानप्रेमींनी या मेळाव्यास उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT