कोकण

नाट्यगृहाच्या दुरवस्थेने मालवणची बदनामी

CD

swt2617.jpg
27332
मालवण ः मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबाबत आयोजित बैठकीस उपस्थित नाट्यप्रेमी.

नाट्यगृहाच्या दुरवस्थेने मालवणची बदनामी
नागरिकांचा आरोप ः ज्येष्ठ कलाकारांनी फोडली होती वाचा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मालवणनगरीची ओळख जगभरात ''पर्यटन पंढरी'' म्हणून आहे; मात्र याच शहरातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेने मालवणकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. १८ फेब्रुवारीला सादर झालेल्या ''आमने-सामने'' या नाटकाच्या प्रयोगांनंतर ज्येष्ठ कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाट्यगृहाच्या समस्यांचा पाढा थेट प्रेक्षकांसमोर वाचला. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मालवणच्या नाट्यगृहाची बदनामी झाली असून याला सर्वस्वी नगरपरिषद प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत आता मालवणकर आक्रमक झाले आहेत.
नगर वाचन मंदिर येथे ''आम्ही मालवणकर''ची मंगळवारी (ता. २४) महत्त्वाची बैठक पार पडली. ''आम्ही मालवणकर'' या भावनेने एकत्र आलेल्या या बैठकीत नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी हा संताप व्यक्त करण्यात आला.
नाट्यगृहाचे गळके छप्पर, मोडकळीस आलेला रंगमंच, अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद असलेली म्युझिक सिस्टीम आणि विंगेतील अस्वच्छता अशा अनेक समस्यांमुळे बाहेरील कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागला. ''आपल्या घरात पाहुणा आला आणि घराच्या अस्वच्छतेमुळे त्याने बाहेर जाऊन चर्चा केली, तर दोष पाहुण्यांचा नसून घरमालकाचा असतो,'' अशा शब्दांत मालवणच्या नाट्यप्रेमींनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. (कै.) मच्छिंद्र कांबळी यांनी ज्या मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार नेला, त्याच भूमीतील मुख्य नाट्यगृहाची ही अवस्था होणे, ही शरमेची बाब असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ''तात्पुरती मलमपट्टी'' करण्यापलीकडे काहीही करत नसल्याने उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. बैठकीत नाट्यगृहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नाट्यगृहाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांना सविस्तर निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी एका अधिकृत समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला. प्रशासनाने जर तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
मालवणचा सांस्कृतिक वारसा आणि भावी पिढीसाठी हे नाट्यगृह सुस्थितीत असणे ही काळाची गरज आहे. केवळ नाट्यगृहच नव्हे, तर समुद्रकिनारे आणि शहर स्वच्छ ठेवून आपली मान पुन्हा उंचावण्यासाठी आता सर्व मालवणकर एकवटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT