कोकण

सावंतवाडीत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा

CD

swt2619.jpg
27339
मुंबई ः उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना प्रवीण भोसले. बाजूला राजन तेली, संदेश पारकर, रमेश कदम व इतर.

सावंतवाडीत सफाई कामगारांच्या
वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा
उद्योगमंत्र्यांकडून निर्देश ः रत्नागिरीच्या धर्तीवर अंमल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना रत्नागिरी नगरपरिषदेच्या धर्तीवर सावंतवाडीतही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी ​२४ फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयात उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देण्याबाबतच्या २४ फेब्रुवारी २०२३ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
​आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी १० सप्टेंबर २०२५ ला दिलेल्या आदेशानुसार, शासन निर्णयातील मुद्दा क्र. ८.२ प्रमाणे सफाई कामगारांची पदे व्यपगत होत नाहीत. तसेच २१ फेब्रुवारी २०२५ च्या नव्या आदेशानुसार यापूर्वीचे संभ्रम निर्माण करणारे सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत. यामुळे आता कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय वारसांना नोकरी मिळणे सुकर झाले आहे.
​याप्रसंगी माजी मंत्री भोसले यांच्यासह माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार रमेश कदम, कामगार नेते संतोष पवार तसेच सफाई कामगारांचे प्रतिनिधी म्हणून गोपाळ सावंत, सुनील परब आणि नितीन कदम उपस्थित होते. या निर्णयामुळे सावंतवाडी नगरपरिषदेतील अनेक कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT