कोकण

कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत पाककला महास्पर्धा

CD

rat२६p१४.jpg-
२६O२७३५५
रत्नागिरी : मैत्री ग्रुप आयोजित रत्नागिरी पाककला महास्पर्धेतील सर्व गटातील विजेत्या महिला.
------------
प्रज्ञा फडके यांचे ‘कायनाचं पिठलं’ ठरलं सर्वोत्कृष्ट
रत्नागिरीतील पाककला महास्पर्धा ; मयेकर, कीर, भागवत गटामध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध,पारंपरिक आणि लुप्त होत चाललेल्या पाककृतींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा अंबर हॉल येथे उत्साहात व दिमाखात पार पडली. यात प्रज्ञा फडके (रा. जांभूळआड) यांनी ‘कायनाचं पिठलं’ ही लुप्त आणि शिवकालीन पाककृती बनवून अंतिम महाविजेत्या (सर्व श्रेणीतून) म्हणून यांना घोषित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर तसेच शहर परिसरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, रस्टिक हॉलिडेजच्या संचालिका शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रा. शेफ मेघना शेलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १५० पैकी ७५ ची निवड अंतिम फेरीसाठी केली. महिलांनी परीक्षकांसमोरच पाककला सादर केली. जिल्ह्यात अशी स्पर्धा पहिल्यांदाच झाली, असे स्पर्धकांनी सांगितले.
बक्षीस वितरण रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी नमिता कीर, श्वेता काळोखे, महेश सावंत, उमेश वायंगणकर,जयेश पटेल, श्रेयश सावंत, डॉ.नितीन सनगर, रश्मीन दुर्वे, नितीन करकरे, अमोल मोरे, मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत व सुहास ठाकूरदेसाई यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
--------
विजेते स्पर्धक
शाकाहारी- प्रथम- श्रावणी मयेकर (पाककृती-चोळक्या भाकरी व हिंग चटणी), द्वितीय- सुलभा फणसळकर (खतखत), तृतीय- विद्या शिर्के (ओल्या नारळाचे गोड वडे), मत्स्याहारी- प्रथम- मिनाक्षी कीर (खेकडा बुर्जी), द्वितीय- अंतरा कळंबटे (पानगा मासा), तृतीय- अवंतिका तिवरेकर (झटपट मुळ्याचं कुवल). मांसाहारी- प्रथम स्वप्नाली भागवत (मातीच्या भांड्यातील काळं चिकन), उत्तेजनार्थ- साक्षी चव्हाण (कुळथाची थाळी), उत्तेजनार्थ संगीता आंबेरकर (भरला बोंबील फ्राय).
-------
चौकट
जुन्या पाककृतींचा दस्तावेज बनवा
या प्रसंगी रमेश कीर यांनी सांगितले, की स्वयंपाकघरातील गृहिणींना प्रतिष्ठा देणारी ही स्पर्धा आहे. रत्नागिरीसाठी सर्व हॉटेल्सना या पाककृती मिळाव्यात, या जुन्या पाककृतींचा एक दस्तावेज बनवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT