कोकण

-रत्नागिरी- ‘ईठ्ठला’ नाटकावर तात्काळ बंदी घाला

CD

rat२६p१६.jpg-
P२६O२७३५७
रत्नागिरी : नाटकावर बंदी घालण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना देताना लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी.
--------
‘ईठ्ठला’नाटकावर बंदी घाला
लांजा तालुका वारकरी संप्रदायाची मागणी, प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : वारकरी संप्रदाय, संतपरंपरा यांच्या संदर्भात विकृत सादरीकरण करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकावर तत्काळ बंदी घालावी तसेच ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतून ते बाद करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी संप्रदायाने केली आहे. या गंभीर बाबीची तातडीने दखल शासनाने घ्यावी अन्यथा संपूर्ण तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही वारकरी संप्रदायातर्फे देण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देण्यात आले. रत्नागिरी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वा. सावरकर नाट्यगृहात वीर शैव समाजनिर्मिती अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक अमोल रंगयात्रीतर्फे सादर करण्यात आले. हे लांजा व रत्नागिरीतील वारकरी व हिंदुत्वनिष्ठांनी पाहिले. हे नाटक वारकरी संप्रदायाचे विकृत सादरीकरण करणारे आणि समस्त विठ्ठलभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे, हे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे या नाटकावर तत्काळ बंदी आणा असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी मनोहर रणदिवे, तुळशीराम मोरे, विष्णू लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, पांडुरंग शिंदे, मनोहर करंबेळे, किशोर लांजेकर, भिकाजी लांजेकर, हिंदू जनजागृती समितीचे भैरूलाल भंडारी, सकल हिंदू समाजाचे अधिवक्ता रूपेश गांगण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT