कोकण

मुंबई-गोवा महामार्गाचे ९.७८१ किमीचे काम शिल्लक

CD

- rat२६p११.jpg-
२६O२७३६४
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथील पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
----
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतीम टप्प्यात
९६ टक्के काम पूर्ण ; नाममात्र तांत्रिक कामे शिल्लक, कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (NH-६६) काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एकूण २५९.५१३ किलोमीटर लांबीच्या अंतरापैकी तब्बल २४९.७३२ किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून, आता केवळ ९.७८१ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाचे ९६.२३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
महामार्गाच्या विविध टप्प्यांचा विचार करता, अनेक भागांत काम १०० टक्के पूर्ण झाले असून काही ठिकाणी मोजकेच काम बाकी आहे. तळेगाव ते काळमठ आणि झाराप ते पत्रादेवी या भागातील काम १०० टक्के पूर्ण झालेले आहे. काळमठ ते झाराप आणि वाकड ते तळेगावादरम्यानचे काम पूर्ण झाले असून, येथे केवळ नाममात्र तांत्रिक कामे शिल्लक आहेत.
परशुराम घाट ते आरवली या ३४.४५ कि.मी. पट्ट्यांपैकी ३२.११ कि.मी. रस्ता तयार झाला असून, ९७.४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्वात जास्त काम आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड या दोन टप्प्यांत शिल्लक आहेत. त्यात आरवली ते कांटे टप्प्यात ८५.०५ टक्के काम पूर्ण झाले असून, सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता तयार होणे बाकी आहे. कांटे ते वाकेड ४९.१५ किलोमीटरच्या या टप्प्यात ९१.१८ टक्के काम झाले असून, सुमारे ५ किलोमीटरच्या कामाची प्रतीक्षा आहे.
-------
चौकट
वेळेची होणार बचत
विशेषतः परशुराम घाट ते झाराप या पट्ट्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे झुकल्याने कोकणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

------
दृष्टिक्षेपात
* एकूण लांबी ः २५९.५१३ कि.मी.
* पूर्ण झालेले काम ः २४९.७३२ कि.मी. (९६.२३ टक्के)
* शिल्लक काम ः ९.७८१ कि.मी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT