कोकण

काँग्रेसतर्फे चिपळुणात आजपासून निवासी प्रशिक्षण शिबिर

CD

कॉंग्रेसचे आजपासून
निवासी प्रशिक्षण
चिपळूण ः नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला चिपळूण येथे पार पडणार आहे. या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील उमेदवार सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली. शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT