कोकण

दिव्यांग बांधवांचा मालवणात ''आनंदोत्सव''

CD

swt2625.jpg
27410
मालवण ः येथे आयोजित दिव्यांग आनंद मेळाव्यात बोलताना मान्यवर.

दिव्यांग बांधवांचा मालवणात ‘आनंदोत्सव’
आनंद मेळावा उत्साहात ः किल्ले दर्शनासह किनाऱ्यावर भ्रमंती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित दिव्यांग आनंद मेळावा उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती संस्था, कसालचे ३० तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, महाराष्ट्र कोकण विभागची शाखा सावंतवाडी व गोवा विभागीय ३५ दिव्यांग या आनंद मेळाव्यात सहभागी झाले.
सकाळी मेळाव्याचे उद्घाटन स़ंस्थेचे कार्याध्यक्ष शैलेश खांडाळेकर, अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, संदीप तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व जीवन यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये कमलाकांत शिरोडकर यांनी प्रथम, दुर्वा निर्गुण यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक ललित गावडे यांनी पटकावला. बास्केटमध्ये बॉल टाकण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे रिया मुंबरकर, रंजना इंदुलकर व अनिल शिंगाडे यांनी यश मिळविले. या स्पर्धेनंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रात गीत गायन स्पर्धा ‘कोकण क्रांती ग्रुप’ आणि ‘दिव्यांग भरारी ग्रुप’ अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. यामध्ये दिव्यांग भरारी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या ग्रुप इन्चार्ज मेघना नाईक तसेच द्वितीय क्रमांक कोकण क्रांती ग्रुपचे लीडर गणेश शिरसाट यांनी प्राप्त केला. संगीत खुर्ची स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात घेण्यात आली. यामध्ये महिला गटात जयश्री मेजरे, पुरुष गटामध्ये संदीप माळवदे यांनी बक्षीस पटकावले.
सर्व विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. त्यानंतर सर्व दिव्यांग मंडळी सेवांगण कर्मचाऱ्यांच्या सोबत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला भेट देण्यासाठी पोहोचले. प्रथम राजकोट, त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन आणि रॉक गार्डन व चिवला किनारा असा प्रवास करत परत सेवांगणमध्ये दाखल झाले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आदर्श राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती व जीवन प्रेरणा संस्थेचे व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी दिली. त्यानंतर शिंगाडे, बाबुराव गावडे तसेच अन्य दिव्यांग सहभागी शिवप्रेमींनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT