हरकुळ बुद्रुकला
आज हरिनाम
सप्ताहाची सांगता
कणकवली : हरकुळ बुद्रुक (ता.कणकवली) गावचे देवस्थान श्री देव कोटेश्वर येथे हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आज सकाळी विविध मंडळांची भजने, दुपारी हरिपाठ, सायंकाळी साडेसातला बुवा वैष्णवी सावंत यांचे भजन, रात्री आठला बुवा संतोष तांबे यांचे भजन, रात्री नऊ वाजता दिंडी भजनाचा कार्यक्रम झाला. यात प्रथम श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक मंडळ आचरा, त्यानंतर श्री गणेश सेवा मंडळ नांदगाव, सदगुरू दिंडी भजन कुडाळ या मंडळांची दिंडी भजने झाली. शनिवारी (ता.२८) सकाळी आठ वाजता बुवा अभिषेक शिरसाट यांचे भजन, त्यानंतर हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद होणार आहे.