कोकण

राज्य नाट्य स्पर्धा

CD

- rat२७p१.jpg-
२६O२७५००
रत्नागिरी ः सुस्वानंद कला प्रतिष्ठान-ठाणे या संस्थेने केलेल्या ‘डोंगरार्त’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)

राज्य नाट्यस्पर्धा-----------लोगो

पीडित स्त्रियांच्या वेदनांचे वास्तववादी चित्रण ः डोंगरार्त
सुस्वानंद कला प्रतिष्ठानचे सादरीकरण; महिला कलाकारांचा कसदार अभिनय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : समाजाच्या मुख्य प्रवाहात पीडित स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान, त्यांच्या वाट्याला येणारी वेदना, अन्याय आणि सामाजिक विषमता यांचे वास्तववादी चित्रण लेखिका अर्पणा क्षेमकल्याणी यांनी ‘डोंगरार्त’ या नाटकातून मांडले आहे.
दिग्दर्शिका मीनल दातार यांच्या कल्पकतेतून राजस्थानमधील पीडित स्त्रियांचे क्रूर वास्तव रंगमंचावर उभे करण्यात ‘सुस्वानंद कला प्रतिष्ठान’ ही संस्था यशस्वी झाली आहे. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने सादर झालेल्या या प्रयोगाला आणि महिला कलाकारांच्या कसदार अभिनयाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
----
‘डोंगरार्त’ हे दोन अंकी नाटक राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडते. नाटकाची सुरुवात ‘मोरणी’च्या विवाहप्रसंगाने होते. एका वृद्ध व्यक्तीशी तिचे लग्न लावले जात असताना, लग्नमंडपातच नवऱ्याचा मृत्यू होतो. या दुर्दैवी घटनेनंतर मोरणीला ‘अपशकुनी’ ठरवून वाळीत टाकले जाते आणि तिची आई ‘सावित्री’लाही समाजातून बहिष्कृत केले जाते. अशा परिस्थितीत ‘जलपा’ नावाचा व्यक्ती त्यांना आधार देतो. त्यांच्या आयुष्यात ‘माँ’ नावाची एक गूढ स्त्री आहे, जी आपली ओळख लपवून असते. कथानक पुढे सरकते तसे धक्कादायक वास्तव उलगडत जाते. गावचा जमीनदार अत्यंत वासनाधीन असून, ‘माँ’ तरुणपणी त्याच्या अत्याचाराची बळी ठरलेली असते. विशेष म्हणजे, जलपा आणि सावित्री ही त्या जमीनदाराचीच अनैतिक अपत्ये असतात. मोरणी ही जलपाची मुलगी असली, तरी तिचा खरा बापही तोच जमीनदार असतो; मात्र हे सत्य लपवून ठेवलेले असते.
जमीनदाराची वाकडी नजर मोरणीवर पडते. तो जलपाला सांगतो की, ‘जर मोरणी तुझी मुलगी असेल तर तिला मला भेटायला पाठव.’ पितृत्वाच्या भोळ्या आशेने जलपा तिला जमीनदाराकडे पाठवतो, जिथे तो तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करतो. या अन्यायाने पेटून उठलेली मोरणी जमीनदाराचा खून करते. या घटनेचा राग धरून जलपा तिला बेदम मारहाण करतो. सत्य समोर येऊनही परिस्थिती बदलत नाही आणि अखेर त्या मारहाणीतच मोरणीचा अंत होतो. नाटकाच्या शेवटी राजस्थानातील ‘रुदाली’ प्रथेचा प्रभावी संदर्भ येतो. यात श्रीमंतांच्या मृत्यूनंतर पैसे घेऊन रडण्यासाठी विधवा स्त्रियांना बोलावले जाते. स्त्रीचे दुःखही जिथे बाजारात विकले जाते, ही सामाजिक शोकांतिका येथे अधोरेखित होते. या नाटकातून स्त्रीशोषण, पुरुषसत्ताक समाजरचना आणि सामाजिक दांभिकतेवर प्रहार करते. यामधून समाज स्त्रीलाच प्रत्येक घटनेला जबाबदार धरून तिच्यावर अपशकुनाचे शिक्के मारतो. जमीनदारासारखे सत्ताधारी पुरुष स्त्रियांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडतात. पितृसत्ताक व्यवस्थेत सत्य दडपले जाते आणि पीडित स्त्रीला कधीच न्याय मिळत नाही.
थोडक्यात, समाजाच्या मुख्य प्रवाहात पीडित स्त्रियांना स्थान नसते, हा ज्वलंत प्रश्न हे नाटक उभे करते. स्त्रीजीवनातील वेदना आणि विषमतेचे हे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते.
----
सूत्रधार आणि साह्य
संगीत- मंदार देशपांडे, आदित्य दुदम, प्रकाशयोजना- आनंद केळकर, चेतन पडवळ, रंगभूषा- अभय शिंदे, केशभूषा- नेहा जगताप, वेशभूषा- शिल्पा दीक्षित, मानसी पुराणिक, गायक- कविता जेशी, आम्रपाली तांबे, मंदार देशपांडे, रंगमंच व्यवस्था- गौरांग दामले.
----
पात्र परिचय
जलपा- शिल्पा दीक्षित, सवित्री-चैताली राजे, मोरणी- रमा अमीन, माँ- वर्षा ओगले, लक्ष्मी- अक्षरा चांदीवाले, माणूस-सिद्धेश साळुंखे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान Viral झालेली ही मिस्ट्री गर्ल कोण? नेटिझन्सनी Grok चं डोकं खाल्लं...

Video: ''लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय'', भाजपच्या मंत्र्यांचं सभागृहात विधान

SCROLL FOR NEXT