कोकण

जीनियस हंट स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

‘जीनियस हंट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
१४ शाळांचा सहभाग ; विजेत्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ : बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित ‘तालुकास्तरीय आंतरशालेय जीनियस हंट स्पर्धा परीक्षा २०२६’ उत्साहात पार पडली. तालुक्यातील १४ शाळांतील ४१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष शरद बाईत यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांचा संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला. या प्रसंगी परीट म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षेत यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि शिस्त आवश्यक आहे. शालेय स्तरावरील अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची तार्किक विचारसरणी आणि आत्मविश्वास वाढतो.’ दुपारच्या सत्रात संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण सोहळा पार पडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डीवायएसपी पदी नियुक्त झालेल्या मनीषा खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
-------
स्पर्धेचा निकाल
स्पर्धेतील विजेते असे (प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ निषाद मोहिते (कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली), तन्वी कदम (श्रीमान तु. ग. गांधी विद्यालय, कोंडगाव), माही वनकर (कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली), अनन्या डोळस (दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी) व सृष्टी गुंजिटे (श्रीमान तु. ग. गांधी विद्यालय, कोंडगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस की भाजप? अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकीय फायदा कुणाला?

Pimpri Chinchwad Crime : काळेवाडीतील लकी बेकरी चौकात पैशांच्या कारणावरून तरुणाचा खून

T20 WC: भारत जिंकतोय खरा, पण...! अनिल कुंबळे, फॅफ ड्यू प्लेसिस यांनी व्यक्त केली चिंता; वेस्ट इंडिजविरुद्ध ही उणीव पडणार महागात

Aurangzeb Daughters : औरंगजेबाने कधीच स्वतःच्या मुलींचे लग्न का केले नाही? कारण वाचून अंगावर येईल काटा, हा क्रूर इतिहास ठेवलेला दडवून

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

SCROLL FOR NEXT