कोकण

व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धेत ''तोंडवली नर्सिंग'' उपविजेता

CD

27539

व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धेत
‘तोंडवली नर्सिंग’ उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २७ ः श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल आयोजित सिंधुदुर्ग, रत्नागिरी इंटर कॉलेज व्हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेत तोंडवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद पटकावले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सिंग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खो-खो व व्हॉलीबॉल इंटर कॉलेज स्पर्धा नुकत्याच कसाल नर्सिंग कॉलेजच्या पटांगणात झाल्या. यामध्ये श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवलीच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात दमदार खेळ केला; मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना प्रा. सागर भोसले, दीपिका गोसावी, लखन चव्हाण, उमेश वडर, अक्षय पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजेतेपद पटकाविलेल्या दोन्ही संघांचे खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, प्रा. शकुंतला नागराज यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : नांदेडमधील महापलिकेच्या सफाई कामगारांचे आज काम बंद आंदोलन

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT