27511
ज्येष्ठ नागरिक रमले वनभोजनात
सोनुर्लीत उपक्रम : महिलांचा लक्षणीय सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ : येथील फेस्कॉन संलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नुकताच आयोजित वनभोजन कार्यक्रम उत्साह, भक्तिभाव आणि सामूहिक ऐक्याचा प्रेरणादायी संगम ठरला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सोनुर्ली येथे हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः महिला सदस्यांचा लक्षणीय सहभाग होता.
प्रवासादरम्यान गाडीत रंगलेली गाणी, भजने आणि टाळ्यांच्या गजरात साकारलेला आनंद सोहळा यामुळे सुरुवातीलाच वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाले. श्री. मोर्ये यांच्या निवासस्थानी सर्वांसाठी नाश्ता-पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. आत्मीयतेने केलेल्या आदरातिथ्यामुळे सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर ''प्रतिपंढरपूर'' म्हणून ख्याती असलेल्या माऊली मंदिरात सर्व ज्येष्ठांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिर परिसरात क्षणभर स्थिरावलेली शांतता आणि प्रार्थनेतील एकाग्रता यांनी उपस्थितांच्या मनाला वेगळाच आध्यात्मिक स्पर्श दिला. दुपारच्या सत्रात पुन्हा श्री. मोर्ये यांच्या घरी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर ‘मेड फॉर यू’ या पर्यटन केंद्राला भेट देण्यात आली. तेथील विविध सुविधा, साहसी उपक्रमांची माहिती घेताना काही ज्येष्ठांनी प्रत्यक्ष खेळांमध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान श्री. निवेलकर यांनी चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था केली. ‘कराओके’ कार्यक्रमात सदस्यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरणात रंगत आणली. हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाच्या लहरींनी संपूर्ण परिसर भारावून गेला. सायंकाळी सर्व सदस्य आनंददायी आठवणींची शिदोरी घेऊन सावंतवाडीत परतले. अध्यक्ष श्री. पावसकर, उपाध्यक्ष श्री. बिर्जे आणि सचिव प्रकाश राऊळ तसेच अण्णा देसाई व अण्णा मालवणकर यांचा अनुभव आणि नियोजनबद्ध तसेच दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. संघटनेतील एकोपा, परस्पर सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे सुंदर दर्शन या वनभोजन सोहळ्यात घडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.