कोकण

राज्यस्तरीय कबड्डीत शिवमुद्रा कौलव विजेता

CD

27513

राज्यस्तरीय कबड्डीत शिवमुद्रा कौलव विजेता

नेरुरपारमधील स्पर्धा; सतेज बाणेर संघ उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ : नेरुरपार येथील शुक्रतारा कला, क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवमुद्रा कौलव संघाने विजेतेपद पटकावले. या संघाने १ लाख रुपये व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवण्याची किमया शिवमुद्रा संघाने साधली आहे. सतेज बाणेर (पुणे) संघाने द्वितीय क्रमांक मिळवत ५५ हजार रुपये व चषक प्राप्त केला.
राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने, शुक्रतारा कला क्रीडा मंडळ, नेरुरपारने सलग ९व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन झंझाळ क्रीडानगरी येथे केले होते. या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ११ दिग्गज संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० साखळी सामने झाले, तर दुसऱ्या दिवशी ४ उपांत्यपूर्व आणि २ उपांत्य सामने खेळवण्यात आले. अंतिम सामना सतेज बाणेर (पुणे) विरुद्ध शिवमुद्रा कौलव (कोल्हापूर) यांच्यात अत्यंत रोमहर्षक झाला. दोन्ही संघांत प्रो-कबड्डीतील दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. प्रो-कबड्डी खेळाडू साहिल पाटील याने शेवटच्या क्षणी केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे शिवमुद्रा कौलव संघ विजयी ठरला.
सामनावीर व उत्कृष्ट चढाईसाठी साहिल पाटील (शिवमुद्रा कौलव, कोल्हापूर), उत्कृष्ट पकड-वैभव रबाडे (शिवमुद्रा कौलव, कोल्हापूर) यांची निवड झाली. आदर्श खेळाडू केतन ऊर्फ भाऊ मापेलकर (अंकुर स्पोर्टस्‌ क्लब, मुंबई शहर), अष्टपैलू खेळाडू पृथ्वीराज शिंदे (सतेज बाणेर, पुणे) यांना गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक अंकुर स्पोर्टस्‌ क्लब (मुंबई शहर), चतुर्थ स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), आदर्श संघ शिवनेरी सेवामंडळ (मुंबई शहर) ठरला.
......................
मान्यवरांचा विशेष सन्मान
नेरुरपारसारख्या ग्रामीण भागात भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल शुक्रतारा कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुभाष नाईक, सचिव शैलेश नाईक, खजिनदार गौरव दाभोलकर, माजी सैनिक अनिल नाईक, सैन्यदलातील अभिषेक नाईक, शांताराम नाईक, पंच प्रमुख सूर्यकांत नाईक, सहायक पंचप्रमुख प्रीतम वालावलकर, निवेदक सचिन मदने, समालोचक सुनील करवडकर, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, पंचायत समिती सदस्या दीप्ती नाईक, प्रदीप नाईक, संदेश नाईक, देविदास नाईक आदींचे विशेष सन्मान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT