कोकण

तळवणेत क्रमांक १ शाळेत मराठी भाषा गौरव दिन

CD

27527

तळवणेत क्रमांक १ शाळेत
मराठी भाषा गौरव दिन

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २८ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवणे क्र. १ येथे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक बापूशेट कोरगावकर यांनी प्रास्ताविक केले. मनीषा राऊळ-नाटेकर यांनी कुसमाग्रज यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी मराठी भाषेबाबत गीत, उत्तम नाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी शाळेच्या वतीने प्रश्नमंजूषा, नाटिका असे विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्याध्यापक युवराज गोसावी, शिवाजी कवडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
....................
27528

‘ग्लोबल’तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
कुडाळ, ता. २७ ः ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा या प्रशालेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यामध्ये पाचवीतील प्रांजल चेऊलकर, नववीतील सृष्टी राणे व रक्षा बांबुळकर, अकरावीतील नयन सावंत व फॅलिक्स डिसोजा या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३,६०० प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. संस्थाध्यक्ष आपासाहेब गावडे, सचिव नागेंद्र परब, संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गावकर यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT