कोकण

हुमरमळावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करू

CD

27541

हुमरमळावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करू

रुपेश पावसकर ः ग्रामपंचायतीतर्फे लोकप्रतिनिधींचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः ‘‘हुमरमळा वालावल गावातील मतदारांनी ज्या अपेक्षेने विकासकामांसाठी मतदान केले आहे, त्यानुसार माझे नेहमीच सहकार्य लाभेल,’’ अशी ग्वाही नेरुर मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिली.
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद सदस्य पावसकर व पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सन्मान सरपंच अमृत देसाई व उपसरपंच रश्मी वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. पावसकर म्हणाले, ‘‘हुमरमळा वालावल गावाचा जगाच्या नकाशावर विकसित गाव म्हणून नावलौकिक झाला आहे. या पंचक्रोशीतील नेतृत्व अतुल बंगे यांचे गावाला मार्गदर्शन लाभल्याने ग्रामपंचायतही यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. याचे श्रेय ग्रामस्थांसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेविका अपर्णा पाटील यांना जाते. या ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार केला आहे. गावातील विकासकामे करण्यावर माझा भर राहील.’’
अतुल बंगे यांचे मार्गदर्शन, माजी आमदार वैभव नाईक यांच्या भक्कम पाठिंबा व मतदारांचे आशीर्वाद या ताकदीवरच मी विजयी झाले. कार्यकर्त्यांची मजबूत फळी व महिला वर्गाचेही पाठबळ मिळाले. येथील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अर्चना बंगे यांनी सांगितले. यावेळी सरपंच अमृत देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्नेहल सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्या हेमांगी कद्रेकर, संजना गुंजकर, ग्रामसेविका अपर्णा पाटील, माजी सरपंच सुरेश वालावलकर, पोलिसपाटील सुबोध सावंत, ग्रामपंचायत सदस्या प्रमोदिनी परब उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-US War: ट्रम्प यांचा पुढचा प्लॅन रेडी! इराणवर हल्ला केल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दुचाकीच्या अपघातानंतर वाहनचालकांमध्ये राडा

Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

SCROLL FOR NEXT