कोकण

मुख्याध्यापक नाईक आज सेवानिवृत्त

CD

टीप जाहिरातीसाठी ही बातमी आहे. जाहिरात असेल त्याच्या बाजूला ही बातमी घेणे.

27552
शिरीष नाईक (मुख्याध्यापक, आरोस विद्या विकास हायस्कूल)


मुख्याध्यापक नाईक आज निवृत्त

आरोसमध्ये सेवाकाळ; निरोप समारंभाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २७ : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक उद्या (ता. २८) निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.
श्री. नाईक यांनी आपल्या सेवाकार्याची सुरुवात १७ जुलै १९९३ ला केली. गेली ३३ वर्षे त्यांनी उत्कृष्ट अध्यापन कार्य करून कित्येक विद्यार्थी घडविले. या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. यात २०१४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचा बाळकृष्ण बागवे स्मृती ‘आदर्श हिंदी प्रचारक’ पुरस्कार, २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कोकणरत्न’ पुरस्कार, २०२१-२२ या वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव पत्र देऊन सन्मान आदींचा समावेश आहे. अध्यापनासह सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय होते. त्यांनी साटेली तर्फ सातार्डा (ता. सावंतवाडी) गावाचे सरपंचपदही भूषविले. या काळात त्यांनी गावात अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात गावाला निर्मल ग्राम पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.
शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात श्री. नाईक यांनी भरीव असे योगदान दिले असून, त्यांचा सेवा कार्यभार पूर्ण होत आहे. यानिमित्त प्रशालेच्यावतीने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोसमध्ये निरोप समारंभाचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २८) होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेच्यावतीने केले आहे.
...................
आदर्श कारकीर्द
श्री. नाईक यांनी आपल्या कारकीर्दीत शैक्षणिक अध्यापनासह सामाजिक, धार्मिक क्षेत्रातही हिरहिरीने भाग घेतला. शाळेच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. सर्वच सहकाऱ्यांसोबत त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी वर्ग मोठ्या आपुलकीने त्यांच्याशी जोडला गेला. यातून त्यांनी पंचक्रोशीत आदर्श स्थान निर्माण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय'', भाजपच्या मंत्र्यांचं सभागृहात विधान

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान Viral झालेली ही मिस्ट्री गर्ल कोण? नेटिझन्सनी Grok चं डोकं खाल्लं...

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT