कोकण

स्वरांग गावडे, गार्गी गुंजाळ कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम

CD

27557

स्वरांग गावडे, गार्गी गुंजाळ
कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित (कै.) गोविंद गणेश विर्नोडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात स्वरांग गावडे, तर तिसरी ते चौथी गटात गार्गी गुंजाळ हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त शिक्षिका कमलताई विर्नोडकर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या निधीतून त्यांचे वडील गोविंद विर्नोडकर स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धोचे उद्‍घाटन व बक्षीस वितरण संस्थाध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव रमेश बोंद्रे, सहसचिव बाळासाहेब बोर्डेकर, संचालक राजेश मोंडकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सहग्रंथपाल रंजना कानसे, महेंद्र सावंत, प्रसाद वाडकर उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल असा ः पहिली ते दुसरी गट-स्वरांग गावडे, ओवी आडेलकर, स्वराली पांगम. तिसरी ते चौथी गट-गार्गी गुंजाळ, सार्थक वालावलकर, विभा नाईक. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कोलगाव मुक्तद्वार ग्रंथालयाच्या पूनम नाईक यांनी काम पाहिले. राजेश मोंडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-US War: ट्रम्प यांचा पुढचा प्लॅन रेडी! इराणवर हल्ला केल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर वादावर तोडगा; वाढीव वीजबिलांसाठी हप्त्यांची सुविधा मंजूर

Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

SCROLL FOR NEXT