कोकण

मंडणगडमधील बागायतदारांच्या समस्यांवर मुंबईत बैठक

CD

- rat२७p१३.jpg-
२६O२७५४०
मुंबई ः येथे आयोजित बैठकीला उपस्थित मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि अन्य बागायतदार.

बागायतदारांच्या समस्यांवर मुंबईत बैठक
मंत्री गोगावले यांच्याशी चर्चा ; स्वतंत्र संशोधन केंद्राची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावातील घसरण अशा चौफेर संकटात सापडलेल्या मंडणगडमधील आंबा बागायतदारांच्या प्रश्नांवर मुंबईतील ‘सुरूची’ निवासस्थानी खलबते झाली. फलोत्पादन मंत्री भरत भोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्जमुक्तीपासून ते स्वतंत्र संशोधन केंद्रापर्यंतच्या महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शासनाने या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने बागायतदारांमध्ये आशेचे वातावरण आहे.
मुंबईतील बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. या बैठकीत कोकणातील आंबापिकावर ओढवलेल्या संकटांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. इतर राज्यांतील आंबा ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून विकला जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. आंबापिकावरील रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रभावी औषधांचा अभाव याकडे बागायतदारांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. हमीभावाचा अभाव आणि बाजारभावातील सततची घसरण थांबवणे गरजेचे आहे. या प्रसंगी बागायतदार आणि विक्रेत्यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या. त्यात आंबा बागायतदारांची संपूर्ण कर्जमुक्ती, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळणे, आंबापिकासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करणे आणि रोगांवर प्रभावी उपाययोजनांसाठी तज्ज्ञांमार्फत औषधनिर्मिती करा यांचा समावेश आहे.
बागायतदारांबरोबर चर्चा झाल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बागायतदारांच्या या सर्व समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे मांडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तर, मंत्री भरत भोगावले यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून बागायतदारांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.
या बैठकीला मिर्झा नाडकर, इस्माईल उंडरे, फैसल परकार, नावेद खान, महंमद खान, साखरकर, आनंद दिवाकर, भाटे, खलील अलीमियाँ तलकर, अकबर अलीमियाँ करेल, उमेश तबीब आदी उपस्थित होते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

Threat Case: व्यावसायिकांवर धमकीचे सावट! अनोळखी क्रमांकावरून कॉल करत कोट्यवधी रुपयांची मागणी; आठवडाभरातील दुसरी घटना

Video : "अर्जुन आणि सायली, तुमचा साबण खूप slow आहे"; टीआरपी घसरल्यावर पुन्हा एकदा प्रियाची डीएनए टेस्ट !

SCROLL FOR NEXT