स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा
संमिश्र व्यवसाय ७०० कोटीवर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आपल्या व्यवहारात सातत्य राखत ठेवी व कर्ज यांचा संमिश्र व्यवसाय ७०० कोटींच्यावर नेला आहे. आज अखेर संस्थेच्या ठेवी ४०१ कोटी २२ लाख झाल्या व संस्थेची कर्ज २९८ कोटी ८६ लाख ८ हजार झाली आहेत. त्यामुळे ७०० कोटींचा संमिश्र व्यवसाय संस्थेने पूर्ण केला. आता ध्येय १००० कोटींकडे आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने ४९ हजार सभासदांच्या सहकार्याने ७०० कोटींचा व्यवसाय अत्यंत शिस्तबद्ध, प्रमाणबद्ध पद्धतीने विश्वासार्हता जपत पूर्ण केला. या संपूर्ण प्रवासात ३०० सभासद त्यांचे १० हजाराचे भांडवल यावर प्रारंभ करत आज १७ शाखा, संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असा आपला विस्तार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
१६९ कोटींच्या बँक गुंतवणुका, ५२ कोटींचा भक्कम स्वनिधी, ९९.७० टक्के कर्ज वसुली, शून्य टक्के, नेट एनपीए, सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग, २८ टक्के भांडवल पर्याप्तता, १० कोटींच्या घरात पोचलेला निव्वळ नफा अशी भक्कम आर्थिक स्थिती ठेवत गेली ३४ वर्ष सहकार तत्त्व आणि व्यावसायिकता यांचा सुरेख संगम करून पतसंस्थेने सातत्यपूर्ण उत्तम निकाल देत आपले अर्थकारण गतिमान ठेवले आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.