27586
कलासाधनेतच जगण्याचे मर्म
राजन नाईक ः कुडाळात ‘कलासंगम’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः ‘‘उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा. कलेची साधना करा. त्यातच जगण्याचे मर्म सापडेल,’’ असे प्रतिपादन उद्योजक राजन नाईक यांनी केले. येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या ‘कलासंगम’ स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, फिजिओथेरपीचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. कल्पना भंडारी, उपप्राचार्य वैशाली ओटवणेकर, बॅ. नाथ पै सीनियर कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅ. नाथ पै बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्रा. चैताली बांदेकर, पल्लवी कामत, सायली वारंग व उमेश गाळवणकर यांचे आई-वडील उपस्थित होते.
‘‘ज्या क्षेत्रात आपण आहात, त्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हाने असतात. त्याला समर्थपणे सामोरे जा. दुसऱ्यांच्या वेदना दूर करत असताना आपल्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना वेदनामुक्तीचा आनंद देऊन जातो, याचे भान ठेवा. परिस्थितीशी संघर्ष करतानाच त्यातून मिळणारा आनंद अनुभवा. डॉक्टर पेशाकडे व्यावसायिक हेतूने न बघता सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, मानवसेवेचे एक उत्तम साधन म्हणून पाहा. सांस्कृतिक उपक्रमांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा,’’ असे आवाहन उमेश गाळवणकर यांनी केले.
महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तेथील संस्कृती व परंपरा घेऊन आलेल्या भावी डॉक्टर विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने व जुन्या-नव्याचा सुरेख संगम साधत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. प्रा. अरुण मर्गज यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैशाली ओटवणेकर यांनी अहवाल वाचन केले. मंदार जोशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.