कोकण

पर्यटन महोत्‍सवाच्या तरतूदीवरून वादंग

CD

पर्यटन महोत्‍सवाच्या तरतूदीवरून वादंग

कणकवली नगरपंचायत; ५५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : कणकवली नगरपंचायतीचा ३ कोटी १ लाख ४१ हजार ४५७ रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक आज नगरपंचायत सभेत सादर करण्यात आले. एकूण ५५ कोटी २५ लाख ६९ हजार रूपयांचे अंदाजपत्रक आहे. यात १० लाख रूपये पर्यटन महोत्‍सवासाठी तरतूद करण्याच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग झाला.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपंचायतीची अर्थसंकल्‍पीय सभा झाली. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक तसेच नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी या सभेला उपस्थित होते. अंदाजपत्रकात पर्यटन महोत्‍सवासाठी १० हजार रूपये तरतूद केली होती. ही तरतूद १० लाख करावी अशी सूचना नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी मांडली. त्‍याला विरोधी पक्ष नगरसेवक बंडू हर्णे, मेघा गांगण यांनी हरकत घेतली. आमच्या सत्ताकाळात आम्‍हीही नगरपंचायतीचे पर्यटन महोत्‍सव केले. त्‍यासाठी नगरपंचायतीकडून एक रूपयाचा निधी घेतला नव्हता. त्‍याच धर्तीवर यंदाही महोत्‍सव आयोजित करा, अशी भूमिका मेघा गांगण, बंडू हर्णे यांनी मांडली. तर नगराध्यक्ष श्री.पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर म्‍हणाले की, दरवर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन महोत्‍सव होतो. त्‍यासाठी मोठा खर्च होतो. त्‍यामुळे १० लाखाची तरतूद हवीच, शक्‍य असल्‍यास आणखी तरतूद वाढवा असा मुद्दा मांडला. त्‍यावेळी विरोधकांनी आपली बाजू मांडताना नगरपंचायतीच्या फंडातून महोत्‍सव करू नका, अशी ठाम भूमिका मांडली. यावर नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी कणकवलीच्या पर्यटन महोत्‍सवासाठी १० लाखांचा निधी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला उपलब्‍ध करून द्या. आम्‍ही नगरपंचायतीचा फंड वापरत नाही, असे सांगून या वादावर पडदा टाकला.
---
बोटिंग प्रकल्‍पावरून आरोप-प्रत्‍यारोप
नगरपंचायतीच्या अंदाजपत्रकात शहरातील पर्यटन केंद्र पुन्हा सुरू करणे तसेच बोटिंग प्रकल्‍प कार्यान्वित करणे, गणपती साणा सुशोभिकरण करणे आदी कामांसाठी तरतूद करण्यात आली. या कामांना बंडू हर्णे यांनी आक्षेप घेतला. श्री.पारकर हे यापूर्वी नगराध्यक्ष असताना त्‍यांनी पर्यटन केंद्र आणि बोटिंग प्रकल्‍प उभारले. मात्र, ते बंद पडल्‍याने या प्रकल्‍पांचा वापर आता शाैचालय म्‍हणून केला जात असल्‍याची टीका त्यांनी केली. त्‍याला नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले. पारकर म्‍हणाले, ‘‘आम्‍ही सत्तेवरून पायउतार झाल्‍यानंतर या दोन्ही प्रकल्‍पांकडे नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, सर्व शहरवासीयांच्या पाठबळावर पुन्हा शहरात सत्तेवर आलो आहोत. आता हे दोन्ही प्रकल्‍प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पर्यटन केंद्राची दुरूस्ती सुरू आहे. सध्या या ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी केंद्र तयार केले आहे. महिन्याभरात हे काम संपताच, त्‍याठिकाणी पुन्हा पर्यटन केंद्र सुरू केले जाणार आहे. तर गडनदीपात्रात बोटिंग प्रकल्‍पाच्या ठिकाणीही शहरवासीयांना विरंगुळ्यासाठी विविध उपक्रम सुरू केले जाणार आहेत.
-----
सांडपाण्याची समस्या दूर करू!
दरम्‍यान, शहरात यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीही कृत्रिम धबधबा आणि इतर कामे केली आहेत. त्‍यांचाही आढावा आम्‍ही घेत आहोत. या प्रकल्‍पामधील सर्व त्रुटी दूर करून आम्‍ही ते प्रकल्‍पही कार्यान्वित करणार असून आम्‍ही कुठल्‍याही प्रकल्‍पाचे शौचालय होऊ देणार नाही, असा टोलाही पारकर यांनी लगावला. शहरात सांडपाणी निचरा ही मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी भुयारी गटार योजना आणि नळपाणी योजनेचे सक्षमीकरण होणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी आम्‍ही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहोत, असेही श्री.पारकर म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT