कोकण

ग्रंथालयांना सक्षम करणे आवश्यक

CD

27739


ग्रंथालयांना सक्षम करणे आवश्यक

महादेव प्रभू ः मुणगेत मराठी भाषा गौरव दिन

मुणगे, ता. २८ ः ‘‘केंद्राने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. मात्र, त्यासाठी आवश्यक निधी अद्यापपर्यंत राज्याला दिला नाही. केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपयोग नाही. शासन आज सार्वजनिक ग्रंथालयांना मराठी भाषा गौरव दिन यांसारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करायला सांगत आहे; मात्र ग्रामीण भागातील ग्रंथालये तुटपुंज्या अनुदानामध्ये असे कार्यक्रम करू शकत नाहीत. शासन ग्रंथालयांच्या समस्या गांभीर्याने घेत नसल्याने सार्वजनिक ग्रंथालये व ग्रंथालय कर्मचारी आर्थिक संकटात आहेत,’’ असे प्रतिपादन येथील श्री भगवती वाचनालयाचे उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू यांनी केले.
‘‘महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कवी कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान आहे. मराठी भाषेचा शिक्षणामध्ये प्रसार व्हावा आणि बोलीभाषेला महत्त्वाचे स्थान मिळावे, यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठी ही राजभाषा असून तिचे संवर्धन आणि जास्तीत जास्त लेखन होण्याच्या उद्देशाने समाजातील प्रत्येक घटकाने योगदान दिले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले. वाचनालयाच्यावतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री भगवती वाचनालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला श्री. प्रभू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्यकारी सदस्य संतोष लब्दे, संजय परुळेकर, धर्माजी आडकर, उज्ज्वला महाजन, तसेच ग्रंथपाल विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे, सौ. मुणगेकर आणि वाचकवर्ग उपस्थित होता. उज्ज्वला महाजन यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-US War: ट्रम्प यांचा पुढचा प्लॅन रेडी! इराणवर हल्ला केल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दुचाकीच्या अपघातानंतर वाहनचालकांमध्ये राडा

Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

SCROLL FOR NEXT