-rat२८p३.jpg-
२६O२७७५९
मंडणगड: शहरात गावभेटीस आलेली गोकुळगावची पालखी व खेळे.
-----
गोकुळगावची पालखी
भाविकांच्या भेटीला
मंडणगड, ता. २८ ः गोकुळगावची ग्रामदेवतेची पालखी शिमोत्सवानिमित्त मंडणगड शहरात आली. या वेळी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीने शहरात दोन दिवस मुक्काम केला.
कोकणचा व गोकुळगावचा शिमगा यांचे अतूट नाते आहे. कोकणामध्ये पहिल्या होमानंतर गावोगावच्या पालख्या दर्शनासाठी बाहेर पडतात. गोकुळगावची पालखी सालाबादप्रमाणे यावर्षी भाविकांच्या भेटीला मंडणगड शहरात आली आहे. गोकुळगावची ग्रामदेवता ही नवसाला पावणारी आहे. त्या पालखीमधील नवसाला पावणाऱ्या अज्ञाथ, सोमय्या, मारती, खेतुरपाल, काळंबादेवी देवी या पाच ग्रामदेवता विराजमान आहेत. मंडणगड शहरातील गाव भेटीनंतर गोकुळगावच्या ग्रामदेवतांच्या पालखीचा प्रवास, गणेशकोंड, शिपोळे, हरिहरेश्वर दोन देवांच मिलन, वेसवी, किल्ला, बलदेवाडी, केंगवळ, कातळकोंड, कांटे, गुडेघर, देव्हारे, केळशीफाटा असा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.