कोकण

क्रीडा सवलत प्रस्तावास मुदतवाढ द्यावी

CD

27762

क्रीडा सवलत प्रस्तावास मुदतवाढ द्या

क्रीडा शिक्षक महासंघ ः शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

मालवण, ता. २८ : क्रीडा सवलत गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्यावी आणि कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ व बॅडमिंटन या खेळांबाबतची तफावत दूर करून त्यांना पूर्णतः सांघिक खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने केली आहे.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी माध्यमिक अध्यापक संघाचे राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गिते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘सध्या क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत अत्यंत मर्यादित आहे. यामुळे अनेक शाळांना स्पर्धांचे निकाल आणि आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत जमा करताना अडचणी येत आहेत. प्रशासकीय विलंबामुळे पात्र आणि मेहनती विद्यार्थी गुणांपासून वंचित राहण्याची भीती आहे. एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाल्यास सर्व शाळांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि एकाही गुणवंत खेळाडूवर अन्याय होणार नाही.
कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये संघात पाच खेळाडूंचा सहभाग असतो; मात्र सवलत देताना केवळ पहिल्या तीन खेळाडूंनाच लाभ दिला जातो. या विसंगतीकडे लक्ष वेधताना अजय शिंदे यांनी विविध मुद्यांवर लक्ष वेधले. यात हे खेळ केवळ वैयक्तिक नसून त्यात संघभावना, नियोजन आणि समन्वयाचा मोठा वाटा असतो. बुद्धिबळातून निर्णयक्षमता, टेबल टेनिसमधून चपळाई, बॅडमिंटनमधून मानसिक ताकद आणि कॅरममधून एकाग्रता विकसित होते. पाच खेळाडूंच्या संघात केवळ तिघांनाच लाभ देणे हे खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या शाळांतील सर्व सहभागी खेळाडूंना गुणांचा लाभ मिळायला हवा. क्रीडा क्षेत्रात घाम गाळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमातील त्रुटींमुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT