कोकण

घारपी शाळेत मराठी भाषा गौरव दिन

CD

27778

घारपी शाळेत मराठी भाषा गौरव दिन
बांदा, ता.२८ : घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कविता गायन स्पर्धेने संपूर्ण शाळा परिसर अक्षरशः सुरांनी न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंचावर येत मराठी कवितांचा गोडवा आपल्या सुरेल आवाजातून साकारला. ‘कणा’ सारख्या प्रेरणादायी कवितांपासून ते निसर्ग, मातृभाषा आणि देशभक्ती व्यक्त करणाऱ्या विविध विषयांवरील कविता विद्यार्थ्यांनी लयबद्ध सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकातील कवितांचे हावभावयुक्त आणि अर्थपूर्ण सादरीकरण घेण्यात आले. प्रत्येक ओळीतून व्यक्त होणारा भाव, चेहऱ्यावरची निरागस अभिव्यक्ती आणि स्पष्ट उच्चार यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी ठरले. या काव्यगायन स्पर्धेचा निकाल असा ः गट पहिली ते दुसरी - मानस नाईक, किर्ती गावकर, श्रेया असनोडकर, यज्ञा कविटकर, सौम्या गावडे, गट तिसरी चौथी -स्वप्निल गावडे, गार्गी गावडे, रूची नाईक, रूद्र सावंत, समर्थ कविटकर, गट पाचवी ते सातवी -वैष्णवी गावडे, इशिका असनोडकर, स्वप्नाली गावडे, यशस्वी सावंत, बाबाजी कविटकर, भिकाजी नाईक, बळीराम गावडे, सिद्धी कविटकर, राज गावडे.
मुख्याध्यापक जे.डी.पाटील व सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT