कोकण

कालवा गळतीने ओटवणेवासीय बेजार

CD

27780

कालवा गळतीने ओटवणेवासीय बेजार

शेतीचे नुकसान; त्वरित उपाय आखण्याची मागणी

ओटवणे, ता. २८ : पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिलारी बांदा शाखा कालव्याला पाणी सोडले खरे; पण या कालव्याच्या मोठ्या प्रमाणावरील गळतीमुळे ओटवणे येथील शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तिलारी कालव्याला ठिकठिकाणी होत असलेल्या या गळतीमुळे येथील शेतकरी राजेश दीपक कर्पे यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत कालव्याच्या गळतीवर ठोस उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत पाणी बंद करावे, अशी मागणी शेतकरी राजेश दीपक कर्पे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तिलारी कालवा विभागाला लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ओटवणे येथील कर्पे यांची शेती कालव्याच्या खालच्या बाजूला आहे. कालव्याला पाणी सोडले की, त्यांच्या शेतात पाणी शिरून थेट पाट वाहू लागतात. सध्या उन्हाळी हंगामात जनावरांसाठी लावलेला चारा या साचलेल्या पाण्यामुळे सडून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने या गळतीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता असून, तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी परिसरातून होत आहे.
---
कोट
कालव्याच्या मोठ्या प्रमाणावरील गळतीमुळे आमच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत योग्य ती भरपाई मिळावी, अन्यथा यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- राजेश कर्पे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT