कोकण

कणकवली आराखड्यावर हरकतींसह, सूचना नोंदवा

CD

27810

कणकवली आराखड्यावर
हरकतींसह, सूचना नोंदवा

नगराध्यक्ष ः आवश्‍यक बदल करू

कणकवली, ता. २८ : शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक आरक्षणांमध्ये बदल झाला आहे. काही आरक्षणे रद्द झालीत, काही आरक्षणांमध्ये बदल झाला. तर काही ठिकाणी नवीन आरक्षणे टाकली आहेत. आम्‍ही या आरक्षणांचा अभ्यास करत आहोत. नागरिकांनीही हा आराखडा काळजीपूर्वक पहावा आणि आवश्‍यकता भासल्‍यास या आराखड्यावर सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज केले.
नगराध्यक्ष दालनात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेेतली. ते म्‍हणाले, शहराचा पहिला विकास आराखडा सन १९९९ पूर्वी तयार केला. त्‍या आरखड्याची मुदत संपल्‍यानंतर आता नवीन विकास आराखडा तयार केला आहे. अनेक जमीन मालकांनी जुन्या विकास आराखड्यावर हरकती नोंदवल्या होत्या. मात्र, त्‍या हरकतींना आता काहीही अर्थ नाही. तर नवीन विकास आराखड्यावर आवश्‍यकता भासल्‍यास हरकती घ्यावयाच्या आहेत. काही ठिकाणी चुकीचे आरक्षण असेल, किंवा काही प्रभागात नवीन रस्त्यांची आवश्‍यकता असेल तर त्‍याबाबतची सूचना किंवा हरकत नगररचना विभाग सिंधुदुर्ग किंवा नगरपंचायत कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावयाची आहे.
श्री.पारकर म्‍हणाले, ‘‘शहराचा विकास आराखडा कालच प्रसिद्ध झालाय. या आराखड्याचा आम्‍ही अभ्यास करत आहोत. जर शहरात आणखी सुविधा निर्माण करायच्या असतील, तसेच काही विकासाच्या बाबी, नवीन विकास आराखड्यात समाविष्‍ट नसतील, तर त्‍याबाबत आम्‍ही ठराव करून तो नगरविकास विभागाकडे पाठविणार आहोत. तसेच आरक्षणामध्ये आवश्‍यकता बदल, नवीन आरक्षणे आदींबाबतही आम्‍ही निर्णय घेणार आहोत. त्‍यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी विकास आराखडा पहावा आणि सूचना, हरकती नोंदवाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT