rat1p13.jpg-
27873
पावसः प्रशालेचे यशस्वी व विद्यार्थी व कलाशिक्षक बक्षीस स्वीकारताना.
राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपिक स्पर्धेसाठी
स्वामी स्वरूपानंदच्या संघाची निवड
पावस, ता. १ ः फिनोलेक्स अकॅडमी येथे झालेल्या ‘एस.ए.ई. इंडिया’ आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ आयोजित रिजनल ऑलिंपिक स्पर्धेत ग्राम सुधारक सेवा समिती (पावस) संचलित स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस या प्रशालेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रशालेच्या संघाने ‘जेटटॉय’ इव्हेंटमध्ये विजेतेपद पटकावून राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपिक स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
ही स्पर्धा प्रतिवर्षी महिंद्रा अँड महिंद्रा आणि एस.ए.ई. इंडिया यांच्यावतीने आयोजित केली जाते. रत्नागिरीत या स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात नाईक कंपनीचे चेअरमन मतिन नाईक यांचा मोठा वाटा आहे. स्पर्धेचे मुख्य सूत्रधार महिंद्रा कंपनीचे डीजीएम सुबोध मोटये, समीर वंजारे, संजय मालप, समीर माडये आणि राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच नाईक कंपनीच्या स्नेहा कुलकर्णी, सुलताना आणि फिनोलेक्स कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने ही स्पर्धा यशस्वीपणे राबवली.
''जेटटॉय'' स्पर्धेत इयत्ता सहावीतील श्रीयांश उमेश घाटकर, समर्थ किरण भोसले, आरोही अभय डोंगरे आणि आरोही सुदिन पावसकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी डिस्टन्स इव्हेंट, वेट डिस्टन्स इव्हेंट आणि इकॉनॉमी इव्हेंटमध्ये विजयी पारितोषिके मिळवून एकूण स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तसेच ''स्किमर'' इव्हेंटमध्ये इयत्ता पाचवीतील स्वराज सुधीर सलपे, आराध्य महेश तरळ, रिद्धी रणजित आग्रे आणि तीर्था वि. शिंदे यांनी ''स्पीड इव्हेंट''मध्ये विजयी पारितोषिक प्राप्त केले.
या दोन्ही स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय भेलेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, प्रशालेची मागील चार वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होत असून, त्यातील दोन वर्षे प्रशालेने विजेता व उपविजेता ही पदे भूषवली आहेत. यावर्षीही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक सज्ज झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.