कोकण

रामपेठेत रंगतोय पारंपरिक आट्यापाट्या खेळाचा थरार

CD

rat1p4.jpg-
27869
रामपेठ ः येथे आट्यापाट्या खेळणारी मुले.

रामपेठेत रंगतोय पारंपरिक आट्यापाट्या खेळाचा थरार
युवा पिढी जपतेय परंपरा; ‘शिमगोत्सवा’तील रात्र जागवताहेत ग्रामस्थ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः मोबाईल गेमिंग आणि क्रिकेटच्या वाढत्या प्रभावात सध्याची पिढी जुने पारंपरिक खेळ विसरत चालली आहे, अशी खंत व्यक्त केली जाते. मात्र, कोकणच्या ग्रामीण भागात आजही अनेक पारंपरिक खेळ मोठ्या उत्साहाने जोपासले जात आहेत. संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजार परिसरात फाकपंचमीपासून ‘आट्यापाट्या’ या खेळाची धूम सुरू असून, तरुणाई या माध्यमातून ‘होलिकोत्सवा’च्या जुन्या परंपरा जपताना दिसत आहे.
होळीच्या दिवसांत दररोज रात्री १० ते पहाटे २ पर्यंत सुमारे ४० ते ५० मुले रामपेठ येथे एकत्र येतात. विशेष म्हणजे, मोठी मुले लहान मुलांना या खेळाचे नियम आणि महत्त्व समजावून सांगत त्यांना खेळात सामावून घेतात. शारीरिक हालचाली आणि अचूक टायमिंगवर आधारित या खेळामुळे उत्तम व्यायाम होतो. फाल्गुन महिना सुरू झाला की, इथल्या सवंगड्यांच्या डोळ्यांसमोर आट्यापाट्यांचे मैदान उभे राहते.
आट्यापाट्या हा अस्सल महाराष्ट्रीय मैदानी खेळ आहे. यात एका संघाने दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेत (पाटीत) अडवणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूने हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी याची स्थूल रूपरेषा असते. या खेळात ‘कोंडी’, ‘हुलकावणी’ आणि ‘शिवाशिवी’ अशा प्रकारांचा समावेश होतो.

चौकट
...असे खेळतात आट्यापाट्या
खेळाचे मैदान ‘सूरपाटी’ व अन्य नऊ पाट्यांमध्ये विभागलेले असते. जेथून खेळ सुरू होतो, तिला ‘कपाळपाटी’ आणि शेवटच्या पाटीला ‘लोणपाटी’ म्हणतात. मैदानाला मधून दुभागणाऱ्या पाटीला ‘मृदंगपाटी’ किंवा ‘सूरपाटी’ म्हटले जाते. या खेळात प्रत्येकी नऊ खेळाडूंचे दोन संघ असतात. अधिकृत सामन्यांमध्ये आठ पंच, एक सरपंच, वेळाधिकारी आणि गुणलेखक अशी यंत्रणा असते.


कोट
संगमेश्वरमधील मुले दरवर्षी विविध सणांच्या परंपरा जपण्यात आघाडीवर असतात. होळीच्या दिवसांत रात्री उशिरापर्यंत रंगणारा हा आट्यापाट्यांचा खेळ विनाखंड सुरू आहे. जुन्या परंपरा जपणे आणि त्या पुढच्या पिढीला शिकवणे, हीच सणांची खरी शिकवण आहे.
- अमोल शेट्ये; व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते, रामपेठ, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

Crime: 'त्या' गोष्टीचा राग डोक्यात गेला; आधी वाद घातला, नंतर फावड्याने वार जीवानिशी संपवला, राजस्थानी तरुणासोबत सांगलीत काय घडलं?

Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो

SCROLL FOR NEXT