27926
मालवणी बोली हा ‘मराठी’चा आत्मा
स्मिता नाईक ः मळगाव वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः प्रत्येकाने आपल्या मराठी मातृभाषा तसेच मालवणी बोली भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मालवणी बोली भाषा हा मराठीचा आत्मा आहे. मराठी भाषेत प्रचंड साहित्य उपलब्ध असून, मराठी भाषा समृद्ध आहे. प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगून भाषेतील वाङ्मय वाचले पाहिजे. मराठी भाषेवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मळगाव वाचनालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून रोज मराठी भाषेचे गौरवगीत सुरू आहे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी स्मिता नाईक यांनी केले.
मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक चंद्रकांत जाधव, शिक्षिका सीमा सावंत उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाला गावातील शतक महोत्सवी जिल्हा परिषद शाळा मळगाव (रस्तावाडा) या शाळेतील ३० मुले उपस्थित होती. शाळेतील श्लोक राऊळ, निधी राऊळ, आलिया राऊळ, आशुतोष तारळकर, ओवी आडेलकर, आराध्या पवार, काव्या राऊळ, देवेश राऊळ, मनस्वी कुंभार, ग्रेस फर्नांडिस, मानसी गंवडे, जान्हवी अमरे, नेहा मेस्त्री, प्रसन्न सोनुर्लेकर, ज्येष्ठ वाचक प्रभाकर तेली या सर्वांनी उत्स्फूर्त सादरीकरण करून मराठी साहित्याचा गौरव केला. मुलांसाठी स्मिता नाईक यांनी ५०० रुपये रोख पारितोषिक दिले. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गंवडे, माजी संचालक बाळकृष्ण मुळीक उपस्थित होते. कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक रितेश राऊळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.