कोकण

मालवणात ‘मिशन भाजी मार्केट’

CD

28019

मालवणात ‘मिशन भाजी मार्केट’

सभापतींची तत्परता; स्वच्छतेसाठी मोहीम हाती


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : ‘स्वच्छ व सुंदर मालवण’ हाच ध्यास आणि श्वास घेऊन पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आता आपले लक्ष ‘मिशन भाजी मार्केट’वर केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत भाजी मार्केट इमारतीच्या परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून संपूर्ण परिसर चकाचक केला जात आहे.
शहरातील बाजारपेठेतील पालिकेच्या भाजी मार्केट इमारतीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे; मात्र तांत्रिक कारणांमुळे हे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. परिणामी या परिसरात झाडी-झुडपे वाढून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती. व्यापाऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य ओळखून सभापती चव्हाण आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी घटनास्थळी दाखल होत कामाला सुरुवात केली. शहराच्या इतर भागातील कचरा उठाव प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी चव्हाण व पाटकर यांनी स्वखर्चाने अतिरिक्त कामगार बोलावले आहेत. जेसीबी मशीन आणि कामगारांच्या मदतीने दोन दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे नियोजन असून, उद्यापर्यंत (ता. १) हा भाग पूर्णपणे चकाचक होणार आहे.
स्वच्छ सुंदर मालवणसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे यावेळी सभापती चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक मंदार ओरसकर, शेखर गाड यांसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT