27974
मराठी भाषेत करिअरच्या संधी
प्रा. रुपेश पाटील ः राणी पार्वतीदेवी प्रशालेत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः इंग्रजी बोलता येत नसेल तर अजिबात मनात न्यूनगंड बाळगू नका. अनेक विदेशी लोकांना देखील इंग्रजी बोलता येत नाही; मात्र ते आपल्या बोलीभाषेचा अधिकाधिक वापर करून जीवनात यशस्वी होतात. म्हणून आपल्या शालेय जीवनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा, यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी येथे केले.
येथील राणी पार्वतीदेवी (आरपीडी) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन आणि करिअरच्या संधी’ या विषयावरील विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, ‘‘भारतात २०११ च्या जनगणनेनुसार तब्बल १९ हजार ५०० पेक्षा अधिक मातृभाषा बोलल्या जातात, ज्यामध्ये मराठीचा वाटा मोठा आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयीन जीवनात मराठी विषय घेऊन अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. उच्च शिक्षण घेऊन नेट-सेटसारख्या परीक्षा देऊन विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक होता येते. याशिवाय विपुल लेखन करून लेखक, पत्रकार, अँकर, सब एडिटर, आकाशवाणीत उद्घोषक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच मराठी भाषांतरकार म्हणून कोर्ट, सरकारी कार्यालये, मंत्रालय आणि विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येते.’’
मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी, प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून व्यवहारी जीवनात तिचा वापर करावा, असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. सुमेधा धुरी यांनी कुसुमाग्रजांची ''कणा'' ही कविता सादर केली. व्याख्याते प्रा. पाटील, आनंद धोंड, आशिष धोंड यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी ''गर्जा महाराष्ट्र माझा'' हे राज्यगीत सादर करून वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पाथरवट यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले. प्रा. प्रज्वला कुबल यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.