26O28168
रत्नागिरीत डेंगी-मलेरियाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम
शिल्पा सुर्वे ः पालिकेकडून धूर फवारणीसह ‘मॉस्किटो ट्रॅप’ उपक्रमाची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रत्नागिरी नगरपालिकेने प्रभाग क्रमांक ६ मध्ये डास प्रतिबंधात्मक विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात धूर फवारणी आणि शौचालयांच्या आऊटलेटला जाळ्या लावण्याच्या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली. हा उपक्रम केवळ एका प्रभागात मर्यादित न राहता, संपूर्ण शहरात अशा प्रकारे डास निर्मूलन मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी दिली.
प्रभाग ६ मधील या उपक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग टिळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे, बांधकाम सभापती संतोष कीर, नगरसेवक राजू कीर, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक राजू कीर यांनी स्वखर्चाने या कामाची सुरुवात केली असून, प्रभागातील आरोग्याला प्राधान्य दिले आहे. ते म्हणाले, ‘संपूर्ण प्रभागात नियमित धूर फवारणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक राजकुमार प्रधान यांनी या उपक्रमाचे कौतुक करतानाच, फवारणीसोबत प्रभावी ‘लिक्विड’चा वापर करण्याची सूचना केली, जेणेकरून डास निर्मूलनाचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहील. पालकमंत्री उदय सामंत आणि नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राजू कीर यांनी दिली. यावेळी उदय शिंदे, वैभव सावंत, हरेश चौगुले, अनिलकुमार बने, वैदेही भोवड, रुचिता सुर्वे, वेदिका पावसकर, सिद्धेश सुवर्णे, कौस्तुभ नागवेकर, ओम कीर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
त्याठिकाणी जाळ्या बसवणार
तसेच शौचालयांच्या व्हेंट पाईपमधून डास बाहेर पडू नयेत, यासाठी जाळ्या बसवण्यात येणार आहेत. डबक्यांमध्ये डास अंडी घालतात, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मॉस्किटो ट्रॅप’ लावण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे,’ असे नगरसेवक राजू कीर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.