27988
फणसगावात कविता वाचनास प्रतिसाद
तळेरे ः कला वाणिज्य महाविद्यालय फणसगाव येथे कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात झाला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले. प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुश्री नारकर यांनी मराठी भाषा ही आपली ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन प्रा. ज्योत्स्ना कदम यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. जान्हवी नारकर यांनी प्रास्ताविक केले. जान्हवी गुरव हिने सूत्रसंचालन केले. अस्मिता पाटील हिने आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र नारकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
......................
27989
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश
सावंतवाडी ः हिंदी विकास संस्थानतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांवर आपली छाप उमटवली. शाळेची विद्यार्थिनी लिसा मेंडीस हिने ''राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान'' प्राप्त केला. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेला शाळेचे पहिली ते दहावीतील एकूण १०९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना सुवर्ण, १२ जणांना रौप्य तर १० विद्यार्थ्यांना कांस्यपदक मिळाले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.