कोकण

चिपळुणातील विकासकामांच्या भूमिपुजनाला पुन्हा खो

CD

विकासकामांचे भूमिपूजन रखडले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : येथील नगरपालिका हद्दीतील कामांचे भूमिपूजन २६ फेब्रुवारीला नंतर ते १ मार्चला करण्याचे जाहीर झाले होते. मात्र रविवारचा हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
जिल्हास्तर नगरोत्थान योजना, विशेष रस्ता अनुदान, मागासवर्गीय कल्याण समिती आणि नगरपरिषद निधीअंतर्गत आर.सी.सी. गटारे, संरक्षक भिंती आणि रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. पेठमाप येथे मोठ्या उत्साहात भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार नीलेश राणे आदी उपस्थित राहणार होते. पालकमंत्र्यांना मुंबईत तातडीच्या शासकीय कामानिमित्त थांबावे लागल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व ११ ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान होणार होता. मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्याने साहित्यप्रेमींतही नाराजीचा सूर उमटला आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT