28184
‘धनंजय फाउंडेशन’तर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कणकवली, ता. ३ : शहरातील धनंजय फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कणकवली तेलीआळी येथील धनंजय फाउंडेशनच्या मार्गदर्शन वर्गाच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमावेळी असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्यासह, सुधीर राणे, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, सत्यवान गावकर, धनंजय फाउंडेशनचे प्रदीप मांजरेकर, शिक्षिका सारिका काणेकर, सोनल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी पाचवी गुणवत्ताधारक विद्यार्थी इरा नागवेकर, अर्णव आपटे (सीबीएससी बोर्ड), अस्मिता गोसावी, पुष्कर महाडिक, पद्मज महाडिक( मराठी माध्यम), परी सांडव, दुर्वांक नाईक, वेदांत गुरव, राजवी पालव ( इंग्रजी माध्यम). आठवी गुणवत्ताधारक विद्यार्थी मयंक महेश चव्हाण, कुणाल मेस्त्री, राज्ञी हर्णे (सीबीएससी बोर्ड ) यश पवार, चेतन भोगटे, जीवल साटम, दुर्वा ठाणेकर, वरद तवटे ( इंग्रजी माध्यम) संतोषी आळवे, अर्थव सावंत (मराठी माध्यम), दहावी गुणवत्ताधारक अनोन्य तांबे, पार्थ राणे आदी गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.