28186
शिवशक्तीनगर-कनकनगर
मार्गावर अखेर लोखंडी पूल
उपनगराध्यक्ष नाईकांचा स्वखर्च
कणकवली, ता. ३ : शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याकडे दोन्ही नगरांना जोडणाऱ्या रस्त्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सुशांत नाईक यांनी स्वखर्चातून दोन्ही नगरांना जोडणारा लोखंडी पूल उभारून दिला.
या पुलामुळे शाळकरी मुलांना ये-जा करणे सुलभ झाले असून नागरिकांनाही सुरक्षित व सुव्यवस्थित मार्ग उपलब्ध झाला आहे. स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर झाल्याने शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचे आभार व्यक्त केले. यावेळी श्रीमती वेलिंग, संजीवनी पवार, एकनाथ सावंत, समीर सावंत, संदेश जाधव, मनमोहन परब, रवी भंडारे आदी रहिवासी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.