कोकण

नाशिकमध्ये रंगला गोदा-आरती सोहळा

CD

नाशिकात रंगला गोदा-आरती सोहळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः ‘तीर्थक्षेत्रे केवळ शासनाच्या सुविधांवर नाही, तर परंपरेचे सातत्य, पुरोहितांची निष्ठा आणि भक्तांच्या अखंड श्रद्धेवर टिकतात,’ असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले. नाशिक पुरोहित संघातर्फे आयोजित पारंपरिक गंगा-गोदा आरती सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. शनिवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
महाराजांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, आरती ही प्रकाश आणि अंधार यांच्यातील आध्यात्मिक संवाद आहे. वेदकाळात नद्यांना मातृस्वरूप मानले गेले आहे, म्हणूनच आपण गोदावरीला ‘माता’ किंवा ‘गौतमी गंगा’ म्हणून पूजतो. ही आरती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ऊर्जा देते. वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि सहस्रावधी दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने गोदाकाठ उजळून निघाला होता. या महाआरतीचे पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, कौस्तुभ शौचे, अलोक गायधनी, अतुल पंचभैय्ये, सौरभ गायधनी, सदानंद देव, निखिल बेळे, अमित पंचभैय्ये, प्रतीक शुक्ल, दिलीप शुक्ल आणि सुमीत बेळे यांनी केले. याप्रसंगी शुभम भालेराव, यश घोडके, यश गायकवाड, प्रशांत मोरे आणि शंकर कोळी यांनी सेवा कार्यात सहकार्य केले. या सोहळ्याला नाशिक पुरोहित संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामानंदाचार्य संप्रदायाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला आग

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT