- rat३p१.jpg-
P२६O२८१८९
मंडणगड : राजे ग्रुपच्या वतीने आयोजित पालखी महोत्सवात माहू ग्रामदेवतेचे पालखी नृत्य सादर करताना खेळी.
----
पालखी महोत्सवाने शिमगोत्सवाला रंगत
मंडणगडमध्ये कलाविष्कार ; ढोलताशांच्या तालावर खेळ्यांचे नृत्य
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ ः शहरातील शिमगोत्सवाला यंदा पालखी महोत्सवामुळे विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग्न राजे ग्रुपतर्फे २८ फेब्रुवारी रोजी परकार कॉम्प्लेक्सच्या आवारात पालखी महोत्सवाचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे राजे ग्रुपचे अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या पुढाकाराने हा पारंपरिक महोत्सव उत्साहात पार पडला.
या महोत्सवात कोंझर, बोरघर, टाकवली, आंबवणे खुर्द, वडवली, माहू, कोन्हवली आदी गावांतील ग्रामदैवतांच्या पालख्यांनी सहभाग घेत पालखी नृत्यकलेचे आकर्षक सादरीकरण केले. तसेच कुंभार्ली येथील खेळ्यांनी कोळी नृत्य आणि पारंपरिक मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. विविध गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या होळीनंतर ‘खेळी जाण्याची’ परंपरा आजही जपली जाते. या काळात ग्रामदैवतांच्या पालख्या मंदिरातून बाहेर पडून सीमोल्लंघन करत गावोगाव फिरतात आणि भाविकांना दर्शनाची संधी देतात. कोन्हवली, टाकवली व गोकुळगाव येथील पालख्यांसमवेत असलेले संकासुर हे शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. होमापूर्वी शहरात एकत्र येणाऱ्या या पालख्यांच्या निमित्ताने राजे ग्रुपतर्फे दरवर्षी पालखी महोत्सव आयोजित केला जातो.
यंदाच्या महोत्सवात विविध गावांतील खेळ्यांनी सादर केलेल्या बहारदार पालखी नृत्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. आयोजकांच्या वतीने सहभागी सर्व पालख्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा माजी मनसे तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पवार, संतोष जाधव, राहुल खांबे, अंकुश सकपाळ, संदीप मोरे, मदन दळवी, शिल्पा मोरे, मनाली दळवी, राजेंद्र येरूणकर व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.