- rat३p४.jpg-
२६O२८१९२
दापोली ः शहरात सफाई करताना डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य.
----
दापोलीत श्रीसदस्यांचे महास्वच्छता अभियान
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३ ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दापोली शहरात भव्य ‘महास्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो श्रीसदस्यांनी या सेवाकार्यात सहभाग घेत अवघ्या काही तासांत सरकारी कार्यालय परिसर चकाचक केला.
प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीनुसार स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. दापोलीमधील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील कचरा संकलन, वाढलेले गवत काढणे आणि साचलेली घाण उपसणे ही कामे श्रीसदस्यांनी श्रमदानातून पूर्ण केली. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ आणि नीटनेटका झाल्याचे पाहायला मिळाले. प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये नेहमीच आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधीलकीला प्राधान्य दिले जाते. या महास्वच्छता अभियानातून केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती आणि सामूहिक श्रमाचा एक आदर्श निर्माण झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.