कोकण

माखजन मराठी शाळेत बाल बाजाराचे आयोजन

CD

माखजन मराठी शाळेत
बाल बाजाराचे आयोजन
संगमेश्वर ः तालुक्यातील माखजन येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा माखजन मराठी येथे विद्यार्थ्यांना व्यापाराची सवय व्हावी, ओळख व्हावी यासाठी प्रशालेच्या पटांगणात बाल बाजर भरवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पालेभाजा, कापडी पिशव्या, पर्स, पेन, उदबत्या, खाद्य पदार्थ, विविध फळे असे विक्रीला आणले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थाटलेली दुकाने पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त खरेदी केली. विद्यार्थ्यांनाही अर्थार्जनाचा आनंद लुटता आला. या प्रसंगी मुख्याध्यापिका नांदिवडेकर, रविंद्र घाणेकर, मितेश पळे, सुप्रिया जाधव, व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा शामल सागवेकर, उपाध्यक्ष बाबू धामणाक आदी उपस्थित होते.

-------
हाजी मुस्तफा शहाबाबांचा
परचुरी येथे ६ रोजी उरूस
गुहागर ः तालुक्यातील परचुरी गावात दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर वाशिष्ठीच्या काठावर वसलेले सुफीपीर हजरत हाजी मुस्तफा शहाबाबांचा व डावलशहा वलीबाबांचा ८३९ वा उरूस ६ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. ८४६ वर्षापूर्वी बगदादहून दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर येवून वसलेल्या बाबांचा उरूस, मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतो. गुहागर तालुक्यासह जिल्हातून तसेच इतर ठिकाणहून सर्व धर्मिय हजारो भाविक बाबांच्या उरूसासाठी व संदलासाठी हजेरी लावतात. उरूसाच्या रात्री सर्व भाविकांना इफतारी व्यवस्था तसेच ७:३० ते १०:३० भोजन ( नियाज) व्यवस्था केलेली आहे. बाबांचा हा उरूस आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी स्थानिक जमातीचे अध्यक्ष फरिदभाई चोगले व त्यांचे सर्व सहकारी विशेष परिश्रम घेतात. हाजी बाबांचा उरूस पवित्र रमजान महिन्यात साजरा होत असल्याने रोजेदारांसाठी इफतारी तसेच नियाज (भोजन) व पहाटे ४:०० वाजता दर्गा शरीफवर चादर चढविल्यानंतर सहेरीची (रोजा) व्यवस्था संयोजकांकडून केली आहे.

----
सावर्डेतील विज्ञान प्रदर्शनात
२१ प्रतिकृतींचे सादरीकरण
सावर्डे : "विज्ञान म्हणजे केवळ रसायने किंवा सूत्रे नसून ती शोध आणि नवसर्जनाची वृत्ती आहे. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्नच विज्ञानाचा पाया रचतात," असे प्रतिपादन अशोक शितोळे यांनी केले. अली पब्लिक स्कूल, सावर्डे येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी २१ कल्पक प्रतिकृतींचे सादरीकरण केले. भारत तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनात मोठी झेप घेत असून, अशा व्यासपीठांतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडतील, असा विश्वास शितोळे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रदर्शनाचे परीक्षण रईस मोडक, इमदाद चिकटे व राहील गोलंदाज यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगातून त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेचे निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) : लहान गट (इ. ४ थी ते ६ वी) : मोहम्मद भोंबल, अमर खान, अरजान कापडी (ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट), सुमेरा पटेल (वॉटर सायकल), आरमान खान व अबूजल राईल. मोठा गट ः शबनम खातून (कचरा व्यवस्थापन), मुआज चिकटे व असूबा गुहागरकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT