कोकण

''आपला मावळा'' संघटनेतर्फे किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता

CD

swt31.jpg
28216
मालवण ः खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वागत केले.

‘आपला मावळा’ संघटनेतर्फे
किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या ‘आपला मावळा’ या मोहिमेचा उत्साह आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. १) सकाळी खासदार लंके यांनी आपल्या ४०० ते ५०० कार्यकर्त्यांसह येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, रेवती राणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार लंके यांनी ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून किल्ले शिवनेरीपासून सुरू केलेली ही मोहीम सिंहगड, प्रतापगड, रायगड, भुदरगड आणि विश्रामगड असा प्रवास करत सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचली. या उपक्रमाला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अशा मोहिमा गरजेच्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेमुळे सिंधुदुर्ग किल्ला परिसर चकाचक झाला. या उपक्रमाचे मालवणवासीयांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

SCROLL FOR NEXT