28322
पालकांनो, मराठी शाळा टिकवा
मंगेश मसके ः ज्ञानदीप वाचनालतात पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः मराठी भाषिकांनीच ‘मराठी’ टिकविली पाहिजे. मराठी शाळा टिकण्यासाठी इथल्या पालकांनीच आपल्या पाल्यांना मराठीतूनच शिकवण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी गोवेरी येथे केले.
ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, गोवेरी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेतलेल्या अभिवाचन, शुद्धलेखन, रंगभरण, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व ग्रंथप्रदर्शनाचा कार्यक्रम येथील संकल्पसिद्धी सभागृहात झाला. वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे अध्यक्षस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराज, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ, मुख्याध्यापक सुरेखा प्रभूखानोलकर, शिक्षक अमोल गोसावी, संतोष शेडगे, स्वरदा वारंग, शुभंगी आचरेकर, कृषी सहाय्यक सौ. सामंत, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे, उपाध्यक्ष राजेंद्र राऊळ, एम. बी. गावडे, स्वरा गावडे, ग्रंथपाल धोंडी गावडे आदी उपस्थित होते.
गावातील एकूण ४६ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू तर खुल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्री. मसके यांच्या हस्ते झाले. ग्रंथप्रदर्शनामध्ये बालवाङमय तसेच प्रतिथयश लेखकांची एकूण ७०० पुस्तके ठेवली होती. ग्रंथपाल गावडे यांनी आभार मानले. वाचनालयाचे अध्यक्ष गावडे यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.