28221
बांद्यात मराठा समाजातर्फे
नाईक, आगलावेंचा सत्कार
बांदा, ता. ३ ः बांदा मराठा समाजाच्यावतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत सौ. नाईक व आगलावे यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, सहसचिव हेमंत मोर्ये, माजी अध्यक्ष बाळु सावंत, नीलेश मोरजकर, सल्लागार आनंद गवस, दीपक सावंत, गुरुनाथ सावंत, नीलेश सावंत, राकेश परब, राजा सावंत, महेश मोर्ये, मनोज सावंत, विकी कदम, महिला मराठा अध्यक्ष स्वाती सावंत, माधवी गाड, अवंती पंडित, अर्चना सावंत, राखी कळंगुटकर, लक्ष्मी सावंत, स्मिता परब आदी उपस्थित होते. राकेश परब यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.