swt38.jpg
28223
नांदगाव ः तिठा परिसरात स्वच्छता करताना स्वच्छतादूत.
नांदगाव तिठा, बाजारपेठ
परिसरात स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३ ः नांदगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन, सिंधुदुर्गच्या वतीने नांदगाव तिठा बाजारपेठ येथे रविवारी (ता. १) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्थानिकांसह, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. नांदगाव तिठा परिसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.
मिशन सिंधुदुर्गचे मुख्य स्वच्छता दूत गणेश जेठे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके, सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती नागेश मोरये, माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर, वैभववाडी नायब तहसीलदार दिलीप पाटील, वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, प्रा. विनायक पाताडे, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा मगदुम, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वायंगणकर, रिक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरये, विलास कांडर, भाऊ काझी, दिलीप बापार्डेकर, तेजस माळकर, सुनील गावकर, संजय सावंत, उत्तम सावंत, प्रदीप राणे उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेस राजू मानकर, पंढरी वायंगणकर, रविराज मोरजकर, श्री. खान यांचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.