कोकण

रत्नागिरी- अलोट गर्दीमध्ये श्री देव भैरीचा शिमगोत्सव सुरू

CD

rat3p10.jpg-
O28234
रत्नागिरी : होळी पौर्णिमेला रात्री श्री देव भैरी मंदिरात श्री देव भैरी आणि मिऱ्या येथील नवलाई- पावणाईच्या पालख्या भेटीचा क्षण.
rat3p11.jpg-
28235
शिमगोत्सवानिमित्त श्री देव भैरी आणि श्री देवी जुगाई आई मंदिरात केलेली आकर्षक पुष्पसजावट.
-----------

अलोट गर्दीमध्ये श्री देव भैरीचा शिमगोत्सव सुरू
पालखी भेटीचा सोहळा संस्मरणीय ; पालखीतून ग्रामप्रदक्षिणा सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : इरवत रे इरवत आणि आमचा भैरीदेव आला मिरवत ऽऽ रे होलिओऽऽ , हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीदेवाचा सोन्याचा तुरा ऽऽ रे होलिओऽऽ, अशा फाकांनी श्री भैरी मंदिराचे प्रांगण दणाणून गेले. मध्यरात्री बारा वाजता ग्रामदैवत श्री देव भैरीला गाऱ्हाणे घालून रत्नागिरीचा बारा वाड्यांचा अधिपती श्री देव भैरीची पालखी मंदिराच्या प्रांगणात आली आणि हजारो भाविक ढोल-ताशांच्या एक काठीच्या नादात भैरी.. भैरी.. भैरी... असा जयजयकार करत होते. पारणे फेडणारा हा क्षण आपल्या डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर झाले. होळीपौर्णिमेच्या मध्यरात्री रत्नागिरीचा राखणदार श्री देव भैरी भक्तांच्या भेटीला आला. ग्रामदैवत श्री देव भैरी-जुगाई, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला जल्लोषी वातावरणात सुरवात झाली.
ग्रामदैवत श्री भैरीच्या भेटीसाठी मिऱ्या गावच्या नवलादेवी, पावणादेवी, टेंभ्ये, काजरघाटी, नाचणे आदी ठिकाणच्या पालख्या येतात. भैरी मंदिराच्या प्रांगणात मध्यरात्री पालख्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत भैरीचा गजर केला. शिमगोत्सवात होळीपौर्णिमेने रंग भरला.
श्री देव भैरी हा बारा वाड्यांचा रखवालदार आहे. त्यामुळेच लाखो भाविक भैरीच्या चरणी नतमस्तक होतात. देवाला भेटण्यासाठी आसपासच्या गावांतील ग्रामदेवता येतात. यामध्ये काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी, टेंभ्ये येथील भैरी-जुगाई यांचा समावेश असतो. पौर्णिमेला भैरीबुवा जोगेश्‍वरीची होळी उभी करण्यासाठी बाहेर पडताच सडामिर्‍या येथील नवलादेवी-पावणादेवी व जाकिमिर्‍या येथील नवलाई, पावणाई या दोन्ही देवी भैरीच्या बहिणी. त्यामुळे या दोन पालख्या होळी उभी करण्यासाठी जाताना भावाच्या भेटीला येतात. विधिवत या पालख्यांची पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात येते.
श्री देव भैरीला गार्‍हाणे घालून मध्यरात्री पालखी बाहेर आली. त्यानंतर पालखी भेट करून पुढे जोगेश्‍वरीची होळी उभी करण्यासाठी गेली. श्री भैरीच्या मंदिरात बारा वाड्यांतील मानकरी, ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

चौकट १
फोटोसाठी झुंबड आणि अलोट गर्दी
श्री देव भैरी-नवलाई पालख्या भेटीचा अनोखा क्षण टिपण्यासाठी मोबाईल, कॅमेरे घेऊन भाविकांची लगबग सुरू होती. ऑफबीट आर्टिस्ट आणि स्पोर्ट्स लाईव्ह या दोन संस्थांनी एकत्र येऊन श्री देव भैरीचा शिमगोत्सव पाच दिवस थेट प्रक्षेपित करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कालपासून थेट प्रक्षेपणाला सुरवात झाली असून या अनोख्या उपक्रमाबद्दल दोन्ही संस्थांचे कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT