कोकण

संगमेश्वर-निनावी देवीच्या अंगणात भक्तिरसाची उधळण

CD

rat9p12.jpg
O28236
संगमेश्वर ः निनावी देवीची सजललेली पालखी.
rat9p13.jpg
28237
संगमेश्वर ः निनावी देवीच्या शिमगोत्सवात सहभागी झालेले भाविक.
----------

निनावी देवीच्या अंगणात भक्तिरसाची उधळण
संगेमश्वरमध्ये शिमगोत्सव; नयनरम्य सोहळ्याने भक्तगण भारावले
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः कोकणातील शिमगोत्सव हा केवळ सण नसून देवीवरील अखंड श्रद्धा, भक्तिरस आणि सामूहिक एकात्मतेचा जिवंत उत्सव आहे. यंदा संगमेश्वर नगरीत हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, पिपाणीचे सुरेल स्वर, गुलालाची रंगतदार उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भक्तिरंगात न्हाऊन निघाले. “हुरारे हूरा... आमच्या निनावी देवीचा तुरा रे तुरा!” अशा जयघोषांनी भक्तांनी आसमंत दणाणून सोडला.
देवीच्या माडावर झेलवत तालासुरात नाचणारे तरुण, महिला, वृद्ध आणि बालक भक्तिरंगात तल्लीन झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत श्रद्धेची चमक होती, तर ओठांवर अखंड जयघोष घुमत होता. भक्तीभावाच्या त्या वातावरणात सर्वजण देवीच्या चरणी समर्पित झाल्याचे दर्शन घडत होते.
महामार्गावरील वाहन चालकांनीही वाहने थांबवून, देवीच्या भक्तिरसात सामील होऊन प्रार्थनेचा आनंद अनुभवला. गर्दीच्या लोंढ्यातही शिस्त आणि भक्तिभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गावीत, हेडकॉन्स्टेबल किशोर जोयशी , हेड कॉन्स्टेबल विनय मनवल ,हेड कॉन्स्टेबल चेतन उत्तेकर आदी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच पुरुष आणि महिला होमगार्ड वाहतूक सुरळीत ठेवत होते. त्यामुळे भक्तांचे सुरळीत दर्शन शक्य केले. मानकरी दत्ताराम सुर्वे आणि जयेंद्र सुर्वे यांनी आपल्या पूर्वजांच्या परंपरा जपत भक्तांमध्ये श्रद्धेचा संदेश पसरवला.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT