कोकण

खर्च लाखोंचा, कारभार ढिसाळपणाचा

CD

28254


खर्च लाखोंचा, कारभार ढिसाळपणाचा

आडारी कचरा प्रकल्प; सभापतींकडून ‘स्पॉट पंचनामा’

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील पालिकेच्या माध्यमातून आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडवर कचरा वर्गीकरण, कंपोस्ट खत निर्मिती आणि स्वच्छतेसाठी वर्षाला ५० लाखांहून अधिक रुपये खर्च केले जात आहेत; मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ कचऱ्याला लागलेली आग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या धक्कादायक प्रकाराची स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ‘स्पॉट पंचनामा’ केला. यावेळी त्यांनी ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी करत ‘‘१५ दिवसांत सुधारणा करा, अन्यथा ब्लॅकलिस्ट करू’’, अशी कडक ताकीद दिली.
प्रशासकीय करारानुसार, या ठिकाणी २१ कामगारांची नियुक्ती असणे अनिवार्य आहे. मात्र, सभापतींनी केलेल्या अचानक पाहणीत केवळ ७ ते ८ कामगारच कार्यरत असल्याचे दिसून आले. हजेरीपटावर मात्र जास्त कामगारांची नोंद करून पालिकेची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत चव्हाण यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला.
लाखो रुपये खर्च करूनही जर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. ठेकेदाराने १५ दिवसांचा वेळ मागितला आहे, तोपर्यंत सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करू, असा इशाराही सौ. चव्हाण यांनी दिला. ठेकेदाराने या कारवाईचा धसका घेतला असून १५ दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. आता १५ दिवसांनंतर आडारी डेपोचे चित्र पालटणार की परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार, याकडे मालवणकरांचे लक्ष लागले आहे.
....................
पालिकेचा पैसा लाटताय का?
‘कागदोपत्री खत निर्मिती दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात प्रकल्प बंदावस्थेत का? डंपिंग ग्राउंडला वारंवार आग कशी लागते? ही आग नैसर्गिक आहे की लावली जाते? परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी असताना सर्वत्र दुर्गंधी का? खोट्या हजेरीपटाद्वारे पालिकेचा पैसा लाटला जात आहे का? असे प्रश्न सभापती सौ. चव्हाण यांनी उपस्थित केले.
---
कोट
काही वर्षांपूर्वी ‘आदर्शवत’ असलेले हे डंपिंग ग्राउंड सध्या नरकयातना सोसत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात या ठिकाणी केवळ कचरा नको, तर खऱ्या अर्थाने स्वच्छतेची गुढी उभारली जावी आणि नियमानुसार काम व्हावे.
- पूनम चव्हाण, सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT