swt320.jpg
28303
निगुडे ः येथे प्रवासी बस फेरीचा प्रारंभ करताना गुरुदास गवंडे, नितीन राऊळ व इतर मान्यवर.
ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याचा आनंद
नितीन राऊळ ः निगुडे मार्गावर ११ बस फेऱ्यांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः निवडणुकीत विजय झाल्यानंतर जेव्हा आम्ही गावात आलो होतो, तेव्हा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रामस्थांनी ही बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आज ती मागणी पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. केवळ बस सेवा सुरू होऊन चालणार नाही, तर ग्रामस्थांनी एसटीनेच प्रवास करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केले.
सावंतवाडी रेल्वे स्थानक, निगुडे आणि सोनुर्ली भागातील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, आजपासून या मार्गावर एकूण ११ एसटी बस फेऱ्यांचा प्रारंभ करण्यात आला. निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे आणि इतर लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. निगुडे तिठा येथे श्री. राऊळ यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन झाल्यानंतर श्री. राऊळ यांनी स्वतः निगुडे ते बांदा असा एसटीने प्रवास केला. त्यांच्यासोबत इन्सुली पंचायत समिती सदस्य सदानंद राणे, कास सरपंच प्रवीण पंडित आणि इतर आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही प्रवासाचा आनंद लुटला.
आजपासून सुरू झालेल्या नवीन वेळापत्रकानुसार सकाळी ७.१५ वाजल्यापासून सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत एकूण ११ फेऱ्या होणार आहेत. यामध्ये बांदा, निगुडे, सोनुर्ली आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक अशा दोन्ही बाजूंनी बस धावणार असल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल निगुडे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींचे कौतुक केले आहे.
या कार्यक्रमाला सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, आप्पा गावडे, शिवा सावळ, माजी सैनिक नाना खडककर, निवृत्त पोलिस अधिकारी गणेश गावडे यांच्यासह निगुडे आणि सोनुर्ली परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुरक्षित एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गवंडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.